हुक्केरी शहरातील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून, शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे बसविण्यात येणार आहेत अशी माहिती माजी खासदार, बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी दिली.

ते आज हुक्केरी शहरात आयोजित सर्व धर्माच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते, हुक्केरीतील कोर्ट सर्कलमध्ये विश्वज्योती बसवेश्वर, जुन्या तहसील कचेरी आवारात राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर, बायपास रोडवर संगोळ्ळी रायण्णा किंवा संत कनकदास, अडवीसिद्धेश्वर मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि बेल्लद बागेवाडी क्रॉसवर अक्कमहादेवी आणि कमतनूर गेट येथील वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये पंचम शिवलिंगेश्वर स्वामी यांच्या सानिध्यात आणि मंत्री उमेश कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविधतेत एकता या तत्वाने हुक्केरीत आपण सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने जगत आहोत. महापुरुषांच्या पुतळ्यांची प्रतिष्ठापना करून इतिहास, जीवनशैली,
इतिहास आणि वारशाची ओळख तरुण पिढीला करून देण्याचा उद्देश आहे असे रमेश कत्ती यांनी सांगितले.
नंतर त्यांनी समाजाच्या नेत्यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या पुतळ्यांच्या प्रतिमांचे अनावरण केले. यावेळी नगराध्यक्ष ए. के. पाटील, सुरेश तळवार, उदय हुक्केरी, नेते अशोक पट्टणशेट्टी, बसवराज पाटील, गजानन क्वळ्ळी, राजू मुन्नोळी, बी. बी. पाटील, पिंटू शेट्टी, सुहास नूली, बसवराज गंगन्नावर, सुनिल भैरन्नावर, आप्पासो तुबाची, मारुती पवार, कुमारा जुटाळे, सिद्धू ढवळेश्वर, राजू अंकले आदी उपस्थित होते.


Recent Comments