Belagavi

शेरी गल्ली, रामलिंग खिंड परिसरात बेशिस्त पार्किंग

Share

बेळगावात ठिकठिकाणी लोक बेशिस्तपणे वाहने उभी करत आहेत. त्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होत आहे. वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

होय,  बेळगावातील शेरी गल्ली क्रॉस, रामलिंग खिंड गल्ली येथे रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे अनेक वाहने पार्क केली जातात. सकाळी उभी केलेली वाहने रात्र झाली तरी तिथेच उभी असतात. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही एका दिवसाची गोष्ट नाही, दररोज अशीच वाहने बेकायदेशीरपणे पार्क केली जातात. त्यामुळे जनता कंटाळली असून, वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात ​आहे. या रस्त्याच्या आजूबाजूच्या गटारी साफ करून किट दिवस झाले कोण जाणे अशी परिस्थिती आहे. आजूबाजूचे वातावरण दुर्गंधीयुक्त आहे. येथे उच्च दाबाच्या केबल जमिनीखालून घालण्यात आल्या आहेत. पण ते काम  देखील योग्यरित्या केलेले नाही. येथील एक हाय व्होल्टेज पॉवर केबल बाहेर आल्याचे दिसत आहे, ती संभाव्य  धोक्याला आमंत्रण देत आहे. एकूणच शेरी गल्ली परिसरात वातावरण गोंधळाने भरले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ याकडे लक्ष देऊन येथील जनतेच्या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: