राज्य आणि केंद्र सरकारमधील भाजप सरकारने महिलांसाठी अनेक लोकप्रिय योजना राबविल्या असून महिला कार्यकर्त्यांनी त्या योजना जाणून घेऊन प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले.

चिकोडी परिसरातील केशव कला भवन येथे भाजप महिला मोर्चाच्या चिकोडी घटकतर्फे आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात त्या बोलत होत्या. भारतीय जनता पक्ष हा इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष असून या पक्षात महिलांना विशेष आणि मनाचे स्थान दिले जाते, असे शशिकला जोल्ले म्हणाल्या.
या समारंभास विधान परिषदेचे मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ हे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. अनेक लोकाभिमुख कार्यक्रम राबविले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर १० हजार रुपये जमा केले आहेत. असे महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.
याचप्रमाणे चिकोडी जिल्हा भाजपाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या समारंभास भाजप महिला मोर्चा सचिव विजयालक्ष्मी उकुमनाळ, विजयालक्ष्मी हमीदखाने, जिल्हा अध्यक्षा शाम्भवी अश्वथपूर, गीता भाते, विभावरी खांडके, सरोजिनी जमदाडे, अस्मिता कुलकर्णी, रुपाली पाटील, शिल्पा इंचल, सतीश अप्पाजीगोळ आदी उपस्थित होते.


Recent Comments