प्रत्येक नागरिकाने रक्तदान करून जीव वाचविण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन माजी आमदार जगदीश मेटगुड्ड यांनी केले.

बैलहोंगल येथे बायपास मार्गावर असलेल्या श्री वीरभद्र कल्याण मानतात येथे माजी आ जगदीश मेटगुड्ड यांच्या वाढदिवसानिमित्त केएलईसंस्था, बीम्स रुग्णालय आणि मेटगुड्ड समर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरादरम्यान ते बोलत होते.
मानवी शरीर वाचविण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या रक्तदानासंदर्भात प्रत्येकाने हातभार लावून जीव वाचविण्याच्या महान कार्यात सहभाग घ्यावा, कठीण काळात रक्तदान करणे हे सर्वात मोठे कार्य आहे, असे मत जगदिश मेटगुड्ड यांनी यावेळी व्यक्त केले. 
या कार्यक्रमास उद्योजक विजय मेटगुड्ड, प्रफुल पाटील, डॉ. बसवराज महंतशेट्टी, गुरु मेटगुड्ड, बेळगाव के एल इ संस्था, बीम्स कर्मचारी आणि जगदीश मेटगुड्ड समर्थकांची उपस्थिती होती .यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात शेकडो जणांनी रक्तदान केले. याचप्रकारे होसूर मार्गावरील बसव वन येथे ६२ रोपांची लागवड वाढदिवसानिमित्त करण्यात आली. या कार्यक्रमाला जगदीश मेटगुड्ड यांच्याहस्ते चालना देण्यात आली.
प्रत्येकाने आपल्या घरासमोर तसेच सार्वजनिक ठिकाणी झाडे लावावीत, त्या झाडांचे संरक्षण करून निसर्ग संरक्षण करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


Recent Comments