Belagavi

दुसऱ्या रेल्वेफाटकाजवळील भिंत कोसळण्याच्या स्थितीत

Share

दुसऱ्या रेल्वेफाटकाजवळील भिंत कोसळण्याच्या स्थितीतबेळगावातील दुसऱ्या रेल्वेफाटकाजवळील रेल्वे रुळाजवळील महिन्यांपूर्वीच बांधलेली संरक्षक भिंत कलली असून कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे येथून येणाऱ्याजाणाऱ्या लोकांना आणि रेल्वेलाही धोका निर्माण झाला आहे. होय, बेळगावातील काँग्रेस रोडवरील डाव्या बाजूला दुसऱ्या रेल्वेगेटजवळील रेल्वे रुळाला लागून फुटपाथच्या बाजूने संरक्षक भिंत ६ महिन्यांपूर्वीच उभारण्यात आली आहे. सिमेंट काँक्रेटच्या तयार फरशा आणि खांब वापरून एकावर एक रचलेल्या पद्धतीने ही भिंत उभारण्यात आली आहे.पाय भक्कम नसल्याने आणि रेल्वेचा वेग आणि रूळांवरील कंपने यामुळे ही भिंत कमकुवत झाली असून कधी कोसळेल याचा नेम नाही. तसे झाल्यास येथून जा-ये करणाऱ्या नागरिकांना आणि प्रसंगी रेल्वेलाही धोका पोहोचू शकतो अशी स्थिती आहे. रेल्वे खात्याने याची दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: