महाराष्ट्रातील मिरज येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सचिन हॉस्पिटलमध्ये रविवारी दि. १७ जुलै रोजी मूल न होणाऱ्या दाम्पत्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण व महिला आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.
सची हॉस्पिटलचे डॉ. सचिन सुगन्नावर व अन्य मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने शिबिराचे उदघाटन केले. त्यानंतर झालेल्या शिबिरात महिलांमधील वंध्यत्वाची कारणे आधुनिक यंत्रोपकरणांद्वारे तपासणी करून उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सचिन सुगन्नावर यांनी स्त्री व पुरुष यांच्यातील वंध्यत्वाची कारणे व औषधोपचार व टेस्ट ट्यूबसारख्या प्रगत तंत्रज्ञान आणि सामाजिक दृष्टिकोन याबद्दल तपासणी करून मार्गदर्शन केले. शिबिरात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील अनेक अपत्यहीन दाम्पत्यांची मोफत तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी डॉ. नेहा व अन्य मान्यवर उपस्थित होते


Recent Comments