बंगळुरात काल झालेल्या मराठा समाज विकास निगमच्या उदघाटन समारंभाला बेळगावातील दक्षिण मतदार संघातील भाजपच्या मराठा समाजाच्या सुमारे एक हजार कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.
१५ बसमधून सुमारे हजारभर मराठा समाजाच्या भाजप कार्यकर्त्यांनी बंगळुरात झालेल्या मराठा समाज विकास निगमच्या उदघाटन समारंभाला हजेरी लावली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते निगमचे उदघाटन झाले. यावेळी भगवे फेटे, भगवे कपडे, भगव्या साड्या घालून पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यामुळे त्यांची उपस्थिती उठून दिसत होती. यावेळी मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई याना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली.


Recent Comments