कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर अनेकजण होरपळून गेले. यासंदर्भात अद्यापही भीती कायम असून कोविडबाबत प्रत्येकाने सतर्क राहून आरोग्याला महत्व द्यावे, असे आवाहन अथणी तालुका आरोग्याधिकारी डॉ. बसगौड कागे यांनी केले आहे.

व्हॉइस : अथणी शहरातील सरकारी प्रथम श्रेणी महाविद्यालयात सरकारी सामुदायिक आरोग्य केंद्र, तालुका प्रशासनाने बूस्टर डोस लसीकरण अभियान आखले होते. या अभियानात सहभागी झालेल्या डॉ. बसगौड कागे यांनी जनतनेला सदर आवाहन केले. सरकार आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत अनेक उपक्रम आखत आहे. यानिमित्ताने १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस देण्यात येत आहे,जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असून बूस्टर डोस मुळे नागरिकांच्या आरोग्यात चांगले परिणाम दिसत असल्याचे ते म्हणाले. ()
यावेळी प्रो. एन. बी. कोटी यांनी जागतिक लोकसंख्या वाढीच्या समस्येवर विशेष व्याख्यान दिले. यावेळी लोकसंख्या वाढीबाबत प्रत्येकाने जागरूक न राहिल्यास भारत चीनला देखील लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकून प्रथम स्थानावर येईल, असे ते म्हणाले.
यावेळी सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डी वाय कांबळे यांच्यासह व्याख्याते आणि विद्यार्थ्यांनी बूस्टर डोस घेतला.


Recent Comments