Belagavi

सचिन हॉस्पिटलमध्ये मोफत वंध्यत्व निवारण व महिला आरोग्य तपासणी शिबीर

Share

महाराष्ट्रातील मिरज येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सचिन हॉस्पिटलमध्ये रविवारी दि. १७ जुलै रोजी मूल होणाऱ्या दाम्पत्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण महिला आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.

सची हॉस्पिटलचे डॉ. सचिन सुगन्नावर व अन्य मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने शिबिराचे उदघाटन केले. त्यानंतर झालेल्या शिबिरात महिलांमधील वंध्यत्वाची कारणे आधुनिक यंत्रोपकरणांद्वारे तपासणी करून उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सचिन सुगन्नावर यांनी स्त्री व पुरुष यांच्यातील वंध्यत्वाची कारणे व औषधोपचार व टेस्ट ट्यूबसारख्या प्रगत तंत्रज्ञान आणि सामाजिक दृष्टिकोन याबद्दल तपासणी करून मार्गदर्शन केले. शिबिरात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील अनेक अपत्यहीन दाम्पत्यांची मोफत तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी डॉ. नेहा व अन्य मान्यवर उपस्थित होते

Tags: