वनश्री संस्थानमठ गाणीग गुरुपिठाचे डॉ. जयबसव कुमार जगद्गुरू हे सोमवारी रात्री व्हीआरएल या खासगी बसने विजापूरहून हरिहर पीठाकडे जात असताना इलकलजवळ त्यांचा अपघात झाला आहे.
अपघातात डॉ. जयबसव कुमार स्वामींच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली असून सुदैवाने त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे स्वामींनी सांगितले आहे.
मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर स्वामींना तातडीने उपचारासाठी बेंगळुरू मधील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. स्वामींच्या आरोग्यासंदर्भात श्रीमठाच्या भक्तांमध्ये चिंता होती. डॉ.जयबसवकुमार श्री यांनी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर भाविकांना निरोप दिला असून भाविकांनी काळजी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अपघातात आपल्या मानेला व पाठीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. माझ्यावर उपचार सुरू असून चार ते पाच दिवसांत मी बरा होईन, कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. आपण लवकरच बरे होऊन भक्तांच्या सेवेत रुजू होणार असून सर्वांनी सहकार्य करावे तसेच अपघातात जखमी झालेल्या सहप्रवाशांच्या तब्येतीसाठीही आपण प्रार्थना करत असल्याचे स्वामीजी म्हणाले.


Recent Comments