पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने महत्वाच्या योजना राबविल्या असल्याचे प्रतिपादन विजयालक्ष्मी उकुमुनाळ यांनी केले.

महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली सरकारने अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या असून आज देशात हजारो महिला उद्योजिका, व्यापारी बनल्या आहेत, असे मत राज्य महिला मोर्चा सचिव विजयालक्ष्मी उकुमुनाळ यांनी व्यक्त केले.
चिकोडी जिल्हा महिला मोर्चा घटक च्या डी केशव कला भवन येथे आयोजिण्यात आलेल्या २ दिवसीय प्रशिक्षण वर्गाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. केंद्राच्या योजनांचा लाभ घेऊन हजारो महिला आज यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत, व्यापारी बनल्या आहेत, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात प्रथमच आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर स्थानापन्न होण्यासाठी उमेदवार म्हणून उभ्या आहेत. त्यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली होते. महिला अधिकाऱ्यांना राज्य व केंद्र शासनाच्या मुख्य उद्दिष्टांची माहिती देण्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. राजेश नेर्ली यांनी दिली.
राज्य सचिव उज्वला बडवाण्णाचे बोलताना म्हणाल्या, भाजपमध्ये महिलांकडे माता- भगिनी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आहे. युवा दृष्टिकोनामुळे महिलांची कार्यक्षमता वाढेल. भारतातील अनेक महिलांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले असून पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज महिलांना उच्च स्थान मिळत आहे. यामुळे भाजपाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्नशील राहूया असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिराचे प्रास्ताविक चिकोडी भाजप महिला मोर्चा अध्यक्षा शाम्भवी अश्वथपूर यांनी केले. यावेळी जिल्हा भाजप जिल्हा प्रधान सचिव सतीश अप्पाजीगोळ, डॉ. ज्योती चिंचणीकर, विजयालक्ष्मी हमीदखाने, अर्चना पडनाळे, प्रकाश अक्कलकोट, शिल्पा इंचल, दीपाली पाटील, गीता मारतुले आदी उपस्थित होते.


Recent Comments