अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेत आलेली काँग्रेसची महिला नेता आज बेळगावात प्रकटली. या नव्यश्रीवर बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या नव्यश्रीने आपल्याविरोधात तक्रार करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल नवा बॉम्ब फोडला आहे.
होय, ही तरुणी जी काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी अध्यक्ष डी. के. सुरेश यांच्यासह काँग्रेस नेत्यांसोबत दिसते, तिचे नाव नव्यश्री आर. राव आहे. मूळची चन्नपट्टणची असणारी नव्यश्री सॉफ्टवेअर इंजिनियर आणि सामाजिक कार्यकर्तीही आहे. तिचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या तरुणीचा आणि बेळगावचा काय संबंध असे म्हणाल तर, फलोत्पादन खात्याचे अधिकारी राजकुमार टाकळे यांच्याशी या तरुणीचे नाते आहे. श्रीमंत पाटील मंत्री असताना त्यांना भेटायला आलेल्या नव्यश्री रामचंद्र राव आणि राजकुमार टाकळे यांचा परिचय झाला आणि या दोघांमध्ये मैत्री वाढली. यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि नव्यश्रीने राजकुमारविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याने राजकुमार यांच्यावर फसवणुकीचा आरोपही केला होता.
यावेळी तडजोड होऊन प्रकरण मागे घेण्यात आले. मात्र आता राजकुमार टाकळे यांनी नव्यश्रीविरोधात तक्रार दाखल केली आहे. नव्यश्री आणि तिचा मित्र तिलकराज डी. टी. यांच्या विरोधात बेळगावच्या एपीएमसी पोलीस स्थानकात खंडणी, जीवे मारण्याची धमकी, दोन लाख रुपये उकळण्यासाठी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी या आरोपाखाली राजकुमार टाकळे यांनी फिर्याद दिली आहे. डिसेंबर 2020 मध्ये बंगळुरूमध्ये काम करत असताना तिची ओळख सॉफ्टवेअर अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून झाली. तिने ओळख झाली त्यावेळी ती चन्नपट्टणममध्ये नव्यश्री फाउंडेशन नावाची एनजीओ चालवत असल्याचे सांगितले होते. मी विवाहित आहे आणि मला तीन मुले आहेत हे माहीत असूनही, तिने माझ्याशी परिचय वाढवून सलगी वाढवली. दीड वर्षात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटलो. 24 डिसेंबर 2021 रोजी मला फोन करून धमकी देण्यात आली की, नव्यश्री आणि माझा एकांतातील व्हिडिओ आहे. मला नव्यश्री आणि थिलकराज यांच्याकडून धमक्या आल्या आहेत. 50 लाख रुपये न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली. नंतर ते माझ्या घरी आले आणि त्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत घर सोडणार नाही असा हट्ट धरला असे फलोत्पादन विभागाचे अधिकारी राजकुमार टाकळे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. यासंदर्भात बेळगावात आलेल्या नव्यश्रीने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.
तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना नव्यश्रीने सांगितले की, मी 15 दिवस भारतात नाही. मी काल भारतात आल्यानंतर मला कळले की माझा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मी पोलिस आयुक्तांना भेटणार आहे. हे कोणी केले..? काय चाललंय, कशासाठी चाललंय..? याची चौकशी करावी लागेल. त्यासाठी अधिकृत तक्रार करावी लागेल. माझ्या विरोधात एफआयआर दाखल झाल्याची कोणतीही माहिती मला नाही, माझ्याशी आतापर्यंत कोणत्याही पोलिसांनी संपर्क साधलेला नाही किंवा एकही फोन आला नाही. माझ्याविरोधात तक्रार दाखल झाली असल्यास, मी एफआयआरची प्रत घेऊन तुम्हाला कळवीन. राजकुमार टाकळे माझे पती आहेत. माझ्या पतीने माझी काय फसवणूक केली आहे ते येत्या काही दिवसांत सांगेन, असा नवा बॉम्ब काँग्रेस नेत्या नव्यश्री यांनी फोडला.
एकंदर काँग्रेस नेत्या नव्यश्रीवर बेळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पुढे हे प्रकरण काय वळण घेते हे पाहावे लागेल.


Recent Comments