चिक्कोडी तालुक्यातील मांजरीवाडी गावात बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते स्वच्छ पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून स्थानिक खासदारांच्या निधीतून मंजूर केलेल्या 5 लाख रुपयांच्या निधीतून स्वच्छ पेयजल प्रकल्प उभारण्यात आला आहे. बसवज्योती युवा फाउंडेशनचे अध्यक्षांनी बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बसवप्रसाद जोल्ले म्हणाले, चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करावा आणि आरोग्य सांभाळावे.
यावेळी बिरेश्वर संस्थेचे अध्यक्ष जयनंद जाधव, संचालक आप्पासाहेब जोल्ले, दिलीप पवार, अमर यादव, संजय नांद्रे, शशिकांत पाटोळे, सुनील खोत, तानाजी लगळे, नंदकुमार रसाळे, सूरज दफेदार, परशुराम पवार, विनायक माने, मनोज यादव तसेच भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments