असोसिएशन ऑफ अलायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या जिल्हा कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच मुधोळ येथे पार पडला.
असोसिएशन ऑफ अलायन्स क्लब इंटरनॅशनलच्या जिल्हा कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभाला मतिवतन रामलिंगम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पीएमसी आयुक्त डॉ. तिम्मन्ना अरळीकट्टी, एस. जी. अंबिगेर, व्यंकण्णा गिद्दप्पानावर, अद्रुशप्पा देसाई आदी पाहुणे म्हणून उपस्थित होते. सहयोगी डॉ. नवीना शेट्टीगार यांनी नवीन सदस्यांचा परिचय करून दिला.
संस्थापक ऍड. दिनकर शेट्टी यांनी मुधोळ क्लबची स्थापना केल्याचे जाहीर केले. वंदना कुलकर्णी यांची अलायन्स क्लब ऑफ मुधोळ संस्कृतीच्या अध्यक्षपदी तर डी. एम. बेन्नूर यांची अलायन्स क्लब ऑफ मुधोळच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मतिवतन यांनी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. बसवराज कोळी यांची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मानसी चौगुले यांची प्रथम व्हीडीजी म्हणून, डॉ. लक्ष्मण जांबगी यांची द्वितीय व्हीडीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
रूपा जी यांची कॅबिनेट सचिवपदी, बसवराज हेडे यांची कॅबिनेट कोषाध्यक्षपदी, अॅड रूपा पाटील यांची जिल्हा पीआरओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिल्हा चेअरमन म्हणून ऍड. शिवानंद मुल्लूर यांची निवड करण्यात आली. आलिया वाळवेकर यांनी स्वागत केले. शंकर सावंत यांनी अलायन्स प्रार्थना सादर केली. यावेळी मतिवतन रामलिंगम, डॉ. नवीना शेट्टीगार यांची भाषणे झाली. रश्मी गिरद्दी आणि तन्वी गिरद्दी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


Recent Comments