बेळगाव जिल्हा रुग्णालयात पुन्हा सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवली असून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना रांगेत ताटकळत उभारावे लागले. यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

व्हॉइस : जिल्हा रुग्णालयात आपल्या वैद्यकीय समस्या घेऊन आलेल्या रुग्णांना तासंतास रांगेत ताटकळत उभारण्याची वेळ आली आहे. सोमवारी सकाळी बीम्स समोर रुग्णांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. सर्व्हर डाऊन असल्या कारणाने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही रांगेत उभारण्याची वेळ निर्माण झाली होती. सर्व्हर डाऊन असल्याने ओपीडीमध्ये नाव नोंदविण्यासाठी रांगा लावलेल्या रुग्णांना उपचाराअभावीच परतण्याची वेळ आली. यावेळी आपल्या लहान मुलांसह आलेल्या महिलांनाही आपल्या मुलांसमवेत रुग्णालयाच्या आवारात बसावे लागल्याचे दिसून आले. (फ्लो)
यावेळी आपली मराठीच्या प्रतिनिधींशी बोलताना येथील रुग्णांनी सांगितले, सकाळपासून आपण रुग्णालयात उपचारासाठी आलो असून दुपार झाली तरीही आपली वेळ आली नाही. रुग्णालयात आल्यावर ओपीडी पेपर्स बनवावे लागतात. मात्र सर्व्हर डाऊन असल्या कारणाने आपला नंबर आलाच नाही. याठिकाणी विविध ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र अशा समस्यांमुळे त्यांची गरसोय होते. बीम्स रुग्णालयात डबल काउंटर स्थापन करण्यात यावे, अशी मागणी रुग्णांकडून करण्यात नयेत आहे.

पहाटे तीन वाजल्यापासून रांगेत उभारणाऱ्या रुग्णांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याची जाणीव रुग्णालय प्रशासनाला असायला हवी. जनतेच्या सुविधेसाठी असणाऱ्या जिल्हा रुग्णालयात सर्व्हर डाऊन ची समस्या असेल तर यासाठी जनतेने काय करावे? असा सवाल संतप्त रुग्णांनी उपस्थित केला. खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची आपली परिस्थिती नसून रुग्णालयाच्या या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी मागणीही रुग्णांनी केली.
जिल्हा रुग्णालयासंदर्भात सातत्याने या ना त्या कारणामुळे समस्यांचा सामना करावा लागतो. नुकत्याच एका मासिकाच्या सर्वेक्षणात बेळगावमधील बीम्स संस्थेला १२ व्या स्थानी मानांकन मिळाले होते. मात्र जनतेच्या संपूर्ण सोयीसाठी अद्यापही बीम्स प्रशासन मागे असल्याचे निदर्शनात येत आहे. अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा खर्च परवडण्यासारखा नसतो. यामुळे रुग्णालय प्रशासनाने भविष्यात जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना असुविधेपासून, गैरसोयींपासून मुक्त करावे, अशी मागणी सामान्य जनता व्यक्त करत आहे.


Recent Comments