Nippani

नशीब चमकावणाऱ्या कारची व्यवस्था घराच्या तिसऱ्या मजल्यावर!

Share

आपल्याला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविणाऱ्या गोष्टीवर नितांत निष्ठा ठेवून कृतज्ञता व्यक्त करणारे अनेक आहेत. निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील एका मेकॅनिक युवकाचीही प्रगती अशाच एका गोष्टीने झाली आणि त्या गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मेकॅनिक युवक आणि त्याच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढविली आहे. पाहुयात यासंदर्भातील हा विशेष रिपोर्ट…

१२ वर्षांपूर्वी आरटीआय शिक्षण पूर्ण केलेल्या निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ या गावातील सूरज नारे या युवकाची हि कहाणी आहे. आपल्या प्रगतीचे कारण ठरलेल्या कार ला चक्क या युवकाने आपल्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर स्थान दिले आहे. ऐकण्यासाठी हे काहीसे वेगळे आहे पण अनेकांच्या भुवया उंचावणारी हि कहाणी कित्येकांना प्रेरणा देणारी आहे.

सहसा आपल्या अंगणात आपले वाहन प्रत्येक जण उभे करतो. मात्र एका वाहनामुळे आपल्या नशिबाचे फासे पालटविणाऱ्या कारला चक्क आपल्या घराच्या छतावर स्थान देणारा हा युवक निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ या गावातील आहे. आयटीआय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात महाराष्ट्रातील पुणे या शहरात गेलेल्या सूरज ने एका गॅरेजमध्ये काम केले. ४ वर्षे काम केल्यानंतर पुन्हा आपल्या गावी स्वतःचे गॅरेज उघडले. गॅरेजसह ड्रायव्हिंग स्कुल देखील सुरु केले. ड्रायव्हिंग स्कुलसाठी या युवकाने एक कारची खरेदी केली. आणि या एका कारच्या माध्यमातून शेकडो लोकांना ड्रायव्हिंग शिकविले. ड्रायव्हिंग स्कुल चालवत असतानाच तीन ते चार कारची खरेदी करत या युवकाने आपल्यासह आपल्या कुटुंबाची प्रगती केली. आणि या कारवार असलेल्या निष्ठेसाठी त्याने सुरुवातीला खरेदी केलेली कार घराच्या छतावर उभी केली. या कारची संपूर्ण नारे कुटुंब पूजा करतात. नतमस्तक होतात.

प्रत्येक शुक्रवारी हि कार धुवून, या कारची पूजा करण्यात येते. संपूर्ण कुटुंबीय कारच्या समोर नतमस्तक होतात. यामागे देखील एक असेच काहीसे कारण आहे. हि कार खरेदी करण्यापूर्वी सुरज नारे याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु जशी हि कार आपल्या आयुष्यात आली तसे आपले नशीब चमकले आणि दिवस पालटले. आज या कारच्या कृतज्ञतेसाठी हि कार छतावर उभी करण्यात आली आहे. क्रेनच्या माध्यमातून गेल्या ६ महिन्यांपूर्वी छतावर उभारण्यात आलेली कर पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होते. हि कार खरी नसून आर्टिफिशियल असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. मात्र या कपूरसोबत सेल्फी घेण्यासाठीही अनेकांची गर्दी होते, हेही तितकेच खरे आहे.

आपल्या प्रगतीसाठी साथ देणाऱ्या गोष्टींवर आयुष्यभर आपला विश्वास असतो. आपल्या अडीअडचणीच्या वेळेत आपल्याला साथ देणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला देव दिसतो. अनेकांच्या यशात आगळ्या वेगळ्या गोष्टींचाही समावेश असतो. माणसात आणि दगडात तर अनेकांना देव दिसतोच मात्र अशा यंत्रात देव शोधणाऱ्या गोष्टी दुर्मिळच असतात हे नक्की.

Tags: