गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. आज जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मांजरी येथील पुलावरून कृष्णा नदीची पाहणी केली आहे.


सोमवारी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी चिकोडी तालुक्यातील मांजरी पुलाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीची पाहणी केली.
यावेळी जिल्हा पालकमंत्र्यांसमवेत जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही, जिल्हा पोलीस वरिष्ठ अधिकारी डॉ. संजीव पाटील, उपविभागाधिकारी संतोष कामगौड आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments