कर्नाटक मराठा समाज अधिवृद्धी निगम कार्यालयाचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण असा संयुक्त कार्यक्रम बेंगळूर येथील राजवाडा मैदान, त्रिपुरवासिनी, बेंगळूर येथे मंगळवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास मराठा समाज बांधवांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव आणि सकल मराठा समाजचे संयोजक किरण जाधव यांनी केले आहे.
कर्नाटक राज्य मराठा समाज अभिवृद्धी निगम प्रारंभोत्सव कार्यक्रम राजवाडा मैदान, त्रिपुरवासिनी, बेंगळूर येथे मंगळवारी सकाळी होणार आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
मराठा समाजाचा समावेश 2-ब प्रवर्गामध्ये करावा अशी मराठा समाजाची मागणी आहे. याशिवाय मराठा समाजाच्या उन्नतीसाठी कर्नाटक मराठा समाज अभिवृद्धी निगमच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. मराठा समाज बांधवानी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन किरण जाधव यांनी केले आहे.


Recent Comments