बेळगाव–गोवा राष्ट्रीय महामार्गावर देसूरनजिक ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर अन्य एक जखमी झाला.

बेळगाव तालुक्यातील देसूरजवळील क्रॉसवर रविवारी सकाळी ट्रक आणि मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात अक्षय हिरेमठ नामक युवकाचा मृत्यू झाला तर आणखी एकजण जखमी झाला आहे.
मृत अक्षय हा गजपती गावचा रहिवासी आहे. जखमी नागय्या याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.


Recent Comments