Kagawad

कागवाड तालुक्यातील उगार येथे ब्राह्मण सभेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Share

ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांनी युवकांनी चांगले शिक्षण घेऊन निर्व्यसनी राहून स्वतःचे व तसेच कुटुंबाचे समाजाचे संरक्षण करावेत असे आवाहन ऐनापुरेतील प्रसिद्ध डॉक्टर आनंदतीर्थ मुतालिक यांनी केला.

रविवारी उगार खुर्द येथील विहार सभा भवन येथे आयोजित केलेल्या ब्राह्मण समाजाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात समाजाच्या वतीने विद्यार्थीचे गुणगौरव व स्नेहसंमेलन कार्यक्रम यावेळी पार पाडण्यात आला.

अथणी तालुक्यातील सती सती गावचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक राजेंद्र कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. समाजाच्या विद्यार्थ्यांना पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

याप्रमाणेच मंगसुळीचे समाजाचे प्रमुख राजू कुलकर्णी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वेदमंत्र पठण राजेश गुरुजी पाहुण्यांचा परिचय नेत्रा कुलकर्णी यांनी केला.उगार साखर कारखान्याचे उद्योगपती प्रफुल शिरगावकर उगार महिला मंडळाच्या अध्यक्षा स्मिताताई शिरगावकर डॉक्टर अण्णा सोमन यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार केला.

गेल्या वर्षभरात उगार परिसरामध्ये विशेष सामाजिक कार्य केलेले समाजाचे समाजसेवक चिंतामणी जोशी संजय शिंदे, रियाज विजापुरे ,प्रकाश तेंडुलकर, उदय जोशी, संदीप देवल, गोपी देवल ,राजू कुलकर्णी, लक्ष्मण कुलकर्णी यांचा डॉक्टर प्रमोद मुतालिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सभेमध्ये पहिली ते पदवीधरापर्यंत100 विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये साक्षी हरीश जागीरदार या विद्यार्थ्याने 99.4% दहावी परीक्षेत मध्ये गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने तसेच ज्ञानश्री मुतालिक पियुषी मध्ये 98 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने धार्मिक पठण मध्ये अनघा कुलकर्णी या विद्यार्थिनी यश संपादन केल्याने या विद्यार्थ्यांचा गौरव या ठिकाणी करण्यात आला.
उगार ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष गजानन काणे, उपाध्यक्ष विठ्ठल कुलकर्णी ,सेक्रेटरी संजीव देशपांडे ,खजिनदार आनंद देशपांडे, माजी अध्यक्ष बाबुराव कुलकर्णी व आर के पाटील यांचा विशेष सहकार या ठिकाणी लाभले समारंभाचे संयोजन शारदा कुलकर्णी संजीव देशपांडे विठ्ठल कुलकर्णी यांनी केला.

Tags: