खानापूर तालुक्यातील 40 महिला स्व सहाय्य बचत गटांना अमृत योजनेंतर्गत प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत निधीचे खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच महिलांच्या उत्थानासाठी कार्यरत असलेल्या आ. अंजली निंबाळकर यांनी आज महिलांच्या स्वावलंबनाला चालना देणाऱ्या अमृत योजनेंतर्गत 40 महिला स्व सहाय्य बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप केले. महिला स्व सहाय्य बचत गटांना उत्पन्न आणि उत्पादन उपक्रम राबवून स्वावलंबी व्हावे या हेतूने या निधीचे वाटप करण्यात आले.

यावेळी आ. निंबाळकर यांच्या साधेपणामुळे कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली.
यावेळी बचत गटांच्या सभासद व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments