इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज मराठा लाईट इन्फंट्री सेंटर, जेएल विंगला 41000 हून अधिक मास्क आणि बेळगाव मिलिटरी हॉस्पिटलला 16000 हून अधिक मास्क प्रदान करण्यात आले.
ब्रिगेडियर मुखर्जी आणि कर्नल पद्मिनी यांना इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखा पदाधिकार्यांकडून मास्क प्रदान करण्यात आले.
यावेळी रेडक्रॉस राज्य व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. एस. बी. कुलकर्णी, विकास कलघटगी, एल. व्ही. श्रीनिवासन आदी उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. एस.बी. कुलकर्णी यांनी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या आधी व नंतर घ्यावयाच्या प्रथमोपचार व बचावकार्याचे महत्त्व आणि खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.


Recent Comments