खानापूर तालुक्यातील कडतन बागेवाडी ते बेकवाड या रस्त्यावर आजूबाजूची झाडे उन्मळून पडल्याने सार्वजनिक वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. वन आणि बांधकाम खात्याने ती हटविली नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

होय, जून ते ऑगस्ट हे सर्वाधिक पावसाचे दिवस. या दिवसांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेली झाडे रस्त्यावर कोसळून लोकांना त्रास होतो. मात्र ज्या सरकारी खात्यांनी अशा आपत्तींबाबत खबरदारी घ्यायला हवी होती, त्यांनीच आता निष्काळजीपणा दाखवल्याने जनतेतुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. खानापूर तालुक्यातील वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे लोकांना मात्र या रस्त्यांवरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कडतन बागेवाडी ते बेकवाड या रस्त्यावर आजूबाजूची झाडे उन्मळून पडून सार्वजनिक वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचे निवेदन संबंधित विभागाला देण्यात आले. मात्र याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याचवेळी रस्त्यालगतची झाडे विद्युत तारांवर पडल्याने वीज पुरवठाही बंद पडला आहे. झाडे कोणी काढायची, वनविभाग की सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा अन्य कुठल्या विभागाने? कोणीही असो, ही झाडे एकदाची हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी खानापूर तालुक्यातील जनतेने केली आहे.


Recent Comments