Belagavi

‘इन न्यूज’ बातमीचा परिणाम शहापूर स्मशानभूमीच्या छताची होणार दुरुस्ती

Share

बेळगाव शहरातील शहापूर स्मशानभूमीत निर्माण झालेल्या छताच्या समस्येसंदर्भात इन न्यूज ने वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन मनपा अधिकाऱ्यांनी छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

व्हॉइस : शहापूर स्मशानभूमीच्या छताला गळती लागल्याने याठिकाणी मृतदेह धन करताना मृतदेहावर पाणी पडायचे. यामुळे अंत्यसंस्कारावेळी अनेक समस्या निर्माण व्हायच्या. यासंदर्भात नागरिकांनी अनेकवेळा पालिका अधिकाऱ्यांना निवेदने, सूचना दिल्या होत्या. मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यासंदर्भात इन न्यूज नेटवर्कने नुकतेच एक वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेत मनपा अधिकाऱ्यांनी या छताची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे.

आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या या समस्येवर इन न्यूज नेटवर्कने प्रकाश टाकताच मनपा अधिकाऱ्यांना जाग आली असून या छताच्या दुरुस्तीचे काम शनिवारपासून हाती घेण्यात आले आहे. शहापूर स्मशानभूमीत नव्याने शेड घालण्यात येत असून याचपद्धतीने आता मनपाने शहरातील इतर स्मशानभूमीतील दुरवस्थेकडेही लक्ष पुरवावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Tags: