हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात अज्ञात मारेकऱ्यांनी एका युवकाचा चाकूने वार करून निर्घृण खून करून मृतदेह फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात राहणाऱ्या परशुराम हलकर्णी नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला आहे. गावातील अंजनेय मंदिराजवळ काही हल्लेखोरांनी चाकूने वार करून हत्या करून फरार झाले. खून झालेला युवक किराणा व्यापारी होता. पोलीस तपासातून त्याच्या हत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. यमकनमर्डीचे निरीक्षक रमेश छायागोळ, पीएसआय न्यामगौडा व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी यमकनमर्डी पोलिसांनी सापळा रचला आहे.


Recent Comments