अनगोळ येथील जनकल्याण ट्रस्ट संचालित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रयामाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमा तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविलेल्या ७५ मान्यवरांच्या सातकर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

संत मीरा शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास विजयेंद्र शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमातील सत्कारमूर्तींचे विद्यार्थी आणि शिक्षकांच्यावतीने पाद्यपूजन करण्यात आले. आपल्या देशाच्या संस्कृतीचे जतन केले तरच भारत टिकेल असे प्रतिपादन विद्वान विजयेंद्र शर्मा यांनी केले. 
आज संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे. हे सर्व आपल्या महापुरुषांच्या आदर्श आणि आशीर्वादामुळे शक्य झाले आहे. आजच्या कार्यक्रमामुळे मला खूप आनंद झाला असून संत मीरा शाळा मुलांना देशाची संस्कृती, चालीरीती आणि विचारांची माहिती देण्याचे अप्रतिम कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दफ्तरदार बोलताना म्हणाल्या, गुरुपौर्णिमा हि आपल्या देशाच्या संस्कृतीचा आदर्श आहे. कोणत्याही वयाचा, जातीचा भेदभाव न करता आपल्या गुरूंचा आदर केला जाती. अनेक शाळांमध्ये गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच स्वयंसेवी संस्थांकडूनही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. संत मीरा शाळेच्या अनेक संस्कार केंद्रांमध्ये मातृ-पितृ पूजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ७५ विविध मान्यवरांचा सत्कार आणि पाद्यपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
या शाळेची विद्यार्थिनी गौसिया माडीवाले या विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेनिमित्त महत्व पटवून देत गुरुविना आपले आयुष्य अपूर्ण असल्याचे सांगितले. आपल्या आयुष्यात ज्ञान आणि परिपूर्ण होण्यासाठी गुरूंची नितांत आवश्यकता असल्याचे तिने सांगितले.
या कार्यक्रमास संत मीरा शाळेचे चेअरमन परमेश्वर हेगडे, ट्रस्टी लक्ष्मण पवार आदींसह मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments