विजापूर शहरातील आर के एम रुग्णालयात महेंद्रकुमार नायक फाउंडेशनतर्फे २० जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती आर के एम रुग्णालयाचे प्रमुख डॉ. शंभूलिंग कर्पूरमठ यांनी दिली.

यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विजापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराची संपूर्ण तयारी झाली असून राष्ट्रउत्थान रक्तपेढी, विजापुर रक्तपेढी, शिवगिरी बँक आणि श्री सिद्धेश्वर रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिरात ८०० हून अधिक लोक सहभागी होऊन रक्तदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात महेंद्रकुमार नायक समर्थक देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोपवाटप कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.
विजापूर ब्लड बँकेचे अध्यक्ष महेश चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले, विजापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासला तर इतर राज्यातून रक्त मिळवावे लागते अशी परिस्थिती आहे. यामुळे दररोज १०० जणांनी रक्तदान केल्यास जिल्ह्यातील जनतेला त्याचा फायदा होईल. रक्तदानासाठी तरुणांनी अधिकाधिक पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुनील चव्हाण यांनी बोलताना सांगितले, ८ रक्तपेढ्या जिल्ह्यात कार्यरत असून दरवर्षी ३० हजार युनिट रक्ताची मागणी असते. मात्र सध्याचा पुरवठा केवळ १८ हजार युनिट असून रक्त संकलनात शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारावर आला घालून जनतेची पिळवणूक थांबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला महेंद्र नायक फाउंडेशनचे अध्यक्ष देवानंद पुजारी, सचिव चेतन मठ, विकास मल्लाडी, अनिल साळुंखे, अमित यळमेली आदी उपस्थित होते.


Recent Comments