Chikkodi

केवळ यशाची स्वप्ने न पाहता ती पूर्ण करण्याचे ध्येय बाळगावे : आर एच भगवान

Share

प्रत्येकाने यशाची स्वप्ने पाहिली पाहिजे. मात्र केवळ स्वप्न न पाहता आपले ध्येय मिळविण्यासाठी प्रयत्न सोडता काम नयेत, असे प्रतिपादन तहसीलदार आर एच भगवान यांनी केले.

रायबाग तालुक्यातील नसलापूर गावात आयोजिण्यात आलेल्या अभिनंदन आणि सत्कार समारंभात ते बोलत होते. मुलांना अभ्यासासोबतच संस्कार शिकविणे महत्वाचे आहे. मुलांना उत्तम संस्कार दिल्यास भविष्यात उत्तम प्रजा बानू शकेल. याचेच एक उदाहरण म्हणजे नसलापूर गाव. नसलापूर गावात एकापेक्षा एक उच्चपदावर कार्यरत असणाऱ्या नागरिकांमुळे तालुक्यातील उत्तम गाव म्हणून नसलापूर गावचे नाव अभिमानाने घेतले जाते असे ते म्हणाले. यावेळी आयएफएस, एमबीबीएस, आयआयटी, सेवानिवृत्त सैनिक अशा अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कल्लाप्पा मगेन्नावर, इरगौडा पाटील, भरतेश बनवणे, डॉ. एन. ए मगदूम, बापूसाब पाटील, आर आर पाटील, अण्णासाहेब खेमलापुरे, ग्राम पंचायत अध्यक्ष मुक्ताबाई केंगननावर, उपाध्यक्ष नेमनाथ कोंबारे, सदस्य पासगौड पाटील, चौगुड पाटील, तालुका पंचायत इओ डॉ. सुरेश कद्दू, बीईओ प्रभावती पाटील, महेश करमाडी, जयपाल बनवणे, पीडीओ दत्ता सावंत आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: