बेळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला लागून असलेल्या उज्वल नगरमध्ये ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्याने महामार्गासह सर्व्हिस रोडवर वाहणारे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे रहिवाशांनी स्थानिक आमदार अनिल बेनके यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले असून, वाहनधारकांना होणारा त्रास सांगता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या शेजारी असलेल्या उज्ज्वल नगरात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने पावसाचे पाणी सर्वत्र रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय होत आहे. आता सर्व रस्ते जलतरण तलावासारखे झाले असून शेजारच्या घरात पाणी शिरल्याने लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे उज्ज्वलनगरातील रहिवाशांनी या संदर्भात स्थानिक आमदारांकडे अनेकवेळा दाद मागूनही काही उपयोग झाला नसल्याचा संताप व्यक्त केला आहे. 
यासंदर्भात आमच्या इन न्यूज-आपली मराठीसोबत बोलताना स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, आम्ही गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक आमदारांना या समस्येबद्दल आवाहन करत आहोत. पण त्यांनी कधीच प्रतिसाद दिलेला नाही. आता आम्ही त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे, सर्वांनी फुले आणि हार आणले आहेत. पण ते अजून आले नसल्याचे उपरोधिकपणे सांगितले. बाईट स्थानिक रहिवासी शाहरुख पटेल यांनी सांगितले की, येथील सर्व्हिस रोडवर ड्रेनेजची योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. राष्ट्रीय महामार्गावरून वाहत येणारे पाणी सर्व्हिस रोडवरून वाहत येऊन आमच्या घरात शिरत आहे. याबाबत स्थानिक आमदारांना कळवूनही त्यांनी काहीच पावले उचललेली नाहीत. निवडणुका तोंडावर आल्यावर आम्हाला मत द्या म्हणून येणारे आमदार आता आमच्या समस्या सोडवत नाहीत असा संताप त्यांनी व्यक्त केला. 
दरम्यान, पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून पाणी येते आणि या सर्व्हिस रोडवरून वाहत असल्याचा रोष स्थानिकांनी व्यक्त केला आहे. इथून आमच्या घरात पाणी शिरते. त्यामुळे पाण्यातुन वाट काढत चालावे लागते. आमची मुले पाण्यातुन धोका स्वीकारून शाळेत जात आहेत. या साचलेल्या पाण्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळणार आहे. त्यामुळे तातडीने ही समस्या सोडवावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली.
पावसाचे पाणी सहज वाहून जाण्यासाठी उज्ज्वलनगरात कोणतीही ड्रेनेज व्यवस्था नाही. पाणी सर्वत्र वाहून लोकांच्या घरात जाते. त्यामुळे उज्ज्वलनगरातील रहिवाशांना मोठा त्रास होत आहे. याबाबत आ. अनिल बेनके यांच्याकडे अनेकदा दाद मागूनही त्याचा फायदा झाला नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष देऊन येथील जनतेला दिलासा द्यावा, अशी सर्वांची मागणी आहे.


Recent Comments