Belagavi

आलुरू वेंकटराव यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

Share

कन्नड कुलपुरोहित आलुरू वेंकटराव यांच्यावर आधारित ‘आलुरू वेंकटरायरू’ या कन्नड पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी बेंगळूर येथील कन्नड साहित्य परिषदेच्या सभागृहात करण्यात आले.

बेंगळूर येथील कन्नड जनशक्ती केंद्राचे अध्यक्ष श्री सी के रामेगौड यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

बेळगावमधील साहित्यिक य. रु. पाटील यांनी हे पुस्तक लिहिले असून बेंगळूरचे माजी महापौर हुच्चप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

Tags: