Belagavi

अनगोळमधील संत मीरा विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

Share

बेळगावातील अनगोळ येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

या गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी हनुमान नगरच्या माजी नगरसेविका सौ. अनुश्री देशपांडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, त्यांच्यासमवेत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता दफ्तरदार, उपमुख्याध्यापिका सौ. ऋतुजा जाधव आणि बालवाडी विभागाचे प्रमुख मधू पुणेकर आणि बालवाडी मुख्याध्यापिका सौ. वनश्री तुक्कार उपस्थित होत्या.

दीपप्रज्वलन व सरस्वतीला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, प्रमुख पाहुण्या अनुश्री देशपांडे यांनी पालकांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता दफ्तरदार यांनी गुरुपौर्णिमा आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: