Belagavi

लोकांच्या उद्धारासाठी ते सिद्धरामोत्सव करताहेत का? मंत्री हालप्पा आचार यांचा काँग्रेस नेत्यांना सवाल..!

Share

लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी काँग्रेस नेते सिद्धरामोत्सव करताहेत. तो लोकांच्या उद्धारासाठी करताहेत? हे सामान्य लोक, गरीबांच्या उद्धारासाठी उत्सव करतात का? असा सवाल मंत्री हालप्पा आचार यांनी काँग्रेस नेत्यांना सवाल केला

मंत्री हालप्पा आचार यांनी बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे आज, शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.   स्वातंत्र्यानंतर 50-60 वर्षे काँग्रेसने सत्ता उपभोगली आहे. त्यामुळेच काँग्रेस नेते सिद्धरामोत्सव आणि राहुल गांधी यांच्या पदयात्रेसारखे उपक्रम करत आहेत. आता त्यांची सत्ता गेली आहे. आता पुन्हा अपरिहार्यपणे सत्ता मिळवण्यासाठी पदयात्रा आणि सिद्धरामोत्सव करत आहेत. राजकीय फायद्याशिवाय जनतेच्या हिताच्या हेतूने तो काहीही करत नाही. अजूनही आपण आहोत हे दाखविण्यासाठी ते हे सगळे करत आहेत अशी टीका आचार यांनी केली.

आमचा भाजप पक्ष देशाचा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षात देशाचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यातील ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन निर्णय घेतात. राष्ट्रीय नेतेच योग्य वेळी समस्येवर तोडगा काढतात, असे प्रसार माध्यमांच्या प्रश्नावर मंत्री हालप्पा आचार यांनी सांगितले.

एकंदर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची मंत्री हालप्पा आचार यांनी अशी खिल्ली उडवली.

Tags: