Khanapur

बेळगाव, खानापूर तालुक्यातील शाळांना आज-उद्या सुट्टी : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा आदेश

Share

गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांना आज शुक्रवार आणि उद्या शनिवार अशी दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहेअसे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली.

गेल्या काही दिवसातील संततधार पावसामुळे तसेच आणखी काही दिवस पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज असल्याने हा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेश बजावला आहे.

Tags: