कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली असून यामुळे पुराचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य खबरदारी घ्यावी, अशा सूचना खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिल्या आहेत.

: पूरग्रस्त भागात निवारण केंद्रांची स्थापना, शुद्ध पिण्याचे पाणी, जेवण आणि पूरग्रस्त भागातील जनतेला कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. चिकोडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चिकोडी, अथणी, रायबाग, कागवाड, निपाणी आणि हुक्केरी तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.
कोयना आणि इतर पाणलोट क्षेत्रात निगराणी ठेवावी, मागील वेळी आलेल्या पुरंदरम्यान झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, सर्व विभागांच्या सहकार्याने हे काम पार पडावे, केवळ एकमेकांवर काम ढकलण्याची मनोवृत्ती कोणीही ठेवू नये याचप्रमाणे सध्याच्या सध्याच्या परिस्थितीत पुराचा अंदाज येत नसून पुढील आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढल्यास नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांना भरपाई मिळण्यासंदर्भात आपण जातीने लक्ष देऊ असे ते म्हणाले. ()
या सभेला उपविभागाधिकारी संतोष कामगौडा, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, गोकाक डीवायएसपी मनोजकुमार नाईक, अथणी डीवायएसपी गिरीश एस व्ही, चिकोडी डी वाय एस पी बसवराज एलिगार, तहसीलदार सी एस कुलकर्णी आदी उपस्थित होते.


Recent Comments