Belagavi

पावसाने झोडपले तर सांगायचे कोणाला? शेतवडीत साचले पाणी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू !

Share

बेळगाव परिसरात वरुणराजाचा कहर सुरूच आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी शेतवडीत पावसाचे पाणी साचले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पावसाने अश्रू आणले आहेत.

होय, गेल्या गेल्या 15 दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. बेळगावच्या आसपासच्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे बेळगावच्या आजूबाजूच्या जमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना शेतीकामासाठी जाता येत नाही. काही शेतकरी पावसाची पर्वा न करता शेती मशागत करत आहेत. या मुसळधार पावसात बैल काम करू शकत नसल्याने स्वत:

अन्नदात्याने आणि त्यांच्या मुलांनी जोखड खांद्यावर घेतले आहे. पावसाच्या पाण्यामुळे मातीत राबणाऱ्या  मुलांचा त्रास न सांगता येण्यासारखा आहे. भाजीपाला पिकवलेल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर सांगायचे कोणाला ही म्हण अक्षरशः खरी ठरली आहे.

मुसळधार पावसामुळे सखल भागात बांधलेली काही घरे कोसळली आहेत. वसाहतीत आजूबाजूला पाणी साचल्याने घराबाहेर पडण्यास रहिवासी विशेषतः लहान मुले, महिला व ज्येष्ठ घाबरत असल्याचे चित्र आहे. शेत-शिवाराला जणू तळ्याचे स्वरूप आले आहे. 

Tags: