Chikkodi

गुरुपौर्णिमेनिमित्त ओंकार आश्रमात गुरुवंदना

Share

रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती गावातील ओंकार आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदना आणि हीरक महोत्सवानिमित्त तुलाभार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गोकाक शून्य संपादन मठाचे श्री मुरूघराजेंद्र स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

बावनसौंदत्ती गावातील ओंकार आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना श्री मुरूघराजेंद्र स्वामीजी म्हणाले, गुरूंना आदराने पहिले पाहिजे. आयुष्यात गुरूंचे शिष्यत्व मिळाल्यास आपले जीवन उजळेल, आहे शब्दात त्यांनी गुरूंचे महत्व सांगितले.

यावेळी ओंकार आश्रम मठाचे शिवशंकर स्वामीजींनी गुरूंविषयीचे महत्व पटवून देताना म्हणाले, गुरूशिवाय आपले ध्येय गाठता येत नाही. ध्येय गाठण्यासाठी आयुष्यात एक तरी गुरु असायलाच हवा. गुरूंमुळे जीवन उजळते असे ते म्हणाले. गावचा विकास हा संस्कारातून व्हावा, या उद्देशाने आपण या गावात स्थायिक झालो असून भविष्यात सुसंस्कृत गाव बनविण्याचा आपला उद्देश असेल, असे ते म्हणाले.

यावेळी ओंकार आश्रमाच्या शिवशंकर स्वामींच्या भक्तांच्या वतीने तुलाभार करण्यात आला. विविध धान्य, गूळ, पैसे, फळे अशा विविध साहित्यातून तुलाभार करण्यात आला. यावेळी शिवशंकर स्वामींचा पाद्यपूजनाचा कार्यक्रम देखील पार पडला.

या कार्यक्रमाला रन्नतीम्मापुरचे श्री बसवराज स्वामीजी, रायरी हुबळीचे शिवानंद मठाचे योगानंद स्वामीजी, महाराष्ट्रातील संगधरी गुरुनाथ महाराज, केरूर येथील ज्योतिगौडा स्वामी, गिरगाव येथील कलमेश्वर मठाचे नरसिंगेश्वर महाराज, कंकणवाडी शिवानंद शरण आदींसह ग्रामस्थ, भक्त उपस्थित होते. साताप्पा बाणे यांनी स्वागत केले तर ज्योती रुप्पाले आणि अनिल बेळगली यांनी आभार मानले.

Tags: