आपल्या कामाच्या खास शैलीमुळे संपूर्ण खानापूर तालुक्यात लोकप्रिय ठरलेल्या आ. डॉ. अंजली निंबाळकर या नंदगड गावातील शाळेत विद्यार्थ्यांच्या गराड्यात सेल्फी घेताना दिसून आल्या.

खानापूर तालुक्यातील नंदगड या गावात एका शाळेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या आ. अंजली निंबाळकरांना विद्यार्थ्यांनी गराडा घातला आणि सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली. नंदगड येथील शाळेत आमदारांनी विद्यार्थ्यांसमवेत वेळ घालवून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी आमदारांसमवेत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली. आपल्या कामाच्या विशेष शैलीमुळे विद्यार्थ्यांच्याही पसंतीस उतरलेल्या आमदारांनी विद्यार्थ्यांसमवेत मनमुराद आनंद लुटत सेल्फी घेतली. 
यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक एम के भजंत्री बोलताना म्हणाले, आमदार अंजली निंबाळकर या शाळेतील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या असता माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे स्मरण झाले. डॉ. अब्दुल कलाम यांच्याभोवतीही विद्यार्थ्यांचा असाच गराडा असायचा. तसेच जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांच्याबाबतीतही अशाच गोष्टी अनेकदा घडल्याचे ते म्हणाले. आमदार अंजली निंबाळकर यांच्यामुळे शाळेत सुवर्णक्षण अनुभवता आल्याचेही ते म्हणाले. 
शाळेच्या कार्यक्रमादरम्यान आमदार अंजली निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारत आणि सेल्फी घेत मनमुराद आनंद लुटला.


Recent Comments