Vijayapura

पोलीस भरती इच्छुकांची विजापुरात निदर्शने

Share

पोलीस भरतीची वयोमर्यादा शिथिल करण्याच्या मागणीसाठी AIDYO संघटनेच्या नेतृत्वाखाली पोलीस भरती इच्छुक उमेदवारांनी विजापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केले.

कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून पोलिस भरती झालेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार भरतीपासून वंचित राहत आहेत. इतर राज्यानी पोलिस भरतीची वयोमर्यादा वाढवली आहे. त्यामुळे आमच्या राज्यातही पोलिस भरतीची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी निदर्शक उमेदवारांनी केली. यावेळी त्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.

Tags: