Vijayapura

जट्टगी गावात सिद्दरामय्यांचा “हौदो हुलिया” जयघोष

Share

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील जट्टगी गावात जट्टगी गावात सिद्दरामय्यांच्या उपस्थितीतहौदो हुलिया” (होय सिंहा) असा जयघोष केल्याची घटना घडली. सिद्धरामय्या यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्यानंतर चाहत्यांनी हा जयघोष केला.

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी काल, गुरुवारी रात्री विजापूरा जिल्ह्यातील यादगिरी ते अलमट्टी असा प्रवास करताना जट्टगी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी आपले समर्थक बी. के. बिरादार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी जमलेल्या समर्थक व चाहत्यांनी सिद्धरामय्या यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. त्यानंतर “हौदो हुलिया” (होय सिंहा) अशा घोषणा देत तरुणांनी सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी धाव घेतली आणि त्यांच्यासोबत सेल्फीही घेतली. दरम्यान, स्थानिक नेत्यांनी सिद्धरामय्या यांचा शाल देऊन गौरव केला. त्यानंतर त्यांनी चहा पिऊन रात्री अलमट्टीकडे प्रयाण केले.

Tags: