Khanapur

गोव्याला जोडणारा सिंदनूर-हेम्माडगा राज्य महामार्ग बंद

Share

भीमगड अभयारण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे कर्नाटक ते गोवा राज्याला जोडणारा सिंदनूरहेम्माडगा राज्य महामार्ग गुरुवारी सकाळी बंद करण्यात आला.

अलात्रा नाल्यावरून चार फूट पाणी वाहत असल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर पोलीस ठाण्याचे हवालदार जयराम हम्मण्णावर व इतर पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड्स लावले आहेत. हा रस्ता बंद करण्यात आल्याचा फलक तेथे लावण्यात आला आहे.

Tags: