Belagavi

कृष्णाकाठ परिसराला आम. श्रीमंत पाटील यांची भेट

Share

कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी कृष्णाकाठावरील कुसनाळ, मोळवाड,, जुगुळ गावातील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन तेथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.

पूरग्रस्त भागात बोटीच्या माध्यमातून आमदार श्रीमंत पाटील यांनी भेट दिली. कुसनाळ, मोळवाड,, जुगुळ गावातील स्थानिकांच्या समस्या जाणून घेत जनतेची मने जिंकली. यावेळी आमदारांसह अनेक अधिकारी देखील उपस्थित होते.

 

आमदारांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना पुराची भीती बाळगण्याची गरज नसल्याचे सांगितले. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन, राज्य सरकार आणि आपण सदैव तत्पर असल्याचे ते म्हणाले. समस्यांसंदर्भात शेजारील गावांसमवेत अधिकाऱ्यांची दोन वेळा प्राथमिक बैठक झाली असून या समस्या सोडविण्यासाठी वैयक्तिक रित्या आपण लक्ष देऊ असे आमदार म्हणाले.

कुसनाळ चे माजी ग्राम पंचायत अध्यक्ष जयपाल यारंडोले यांनी गावातून बाहेर जाण्यासाठी बोटीची आवश्यकता असून आमदारांनी बोटीची व्यवस्था करावी अशी मागणी केली. आमदारांनी जिल्हाधीकार्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर बोटीची व्यवस्था करावी असे सांगितले. बोटीची व्यवस्था न झाल्यास आपण स्वखर्चातून बोट देऊ असेही आमदार म्हणाले.

यावेळी आमदारांसमवेत दादा पाटील, राजेंद्र पोतदार, ग्राम पंचायत माजी अध्यक्ष जयपाल एरंडोले , अध्यक्ष दीपा खन्नीकोडे , उपाध्यक्ष निर्मला पाटील, सुभाष अथणी, अमित पाटील, विजय खन्नीकोडे , चिदानंद अथणी, संदीप मगदूम, राणी गुरव, विनयश्री मगदूम, पीडीओ यशवंत आदींसह इतर उपस्थित होते.

Tags: