डॉ. प्रकाश रायकर फाऊंडेशनतर्फे बेळगाव येथे १७ जुलै रोजी एक दिवसीय तबला कार्यशाळा आयोजित केली असून यात प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री अनिंदो चटर्जी सहभागी होणार आहेत अशी माहिती तरंग म्युझिक अकादमीच्या संचालिका व डॉ. रायकर फौंडेशनच्या सचिव समीरा यांनी दिली.

बेळगावात गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना समीरा म्हणाल्या, रविवार दि. 17 जुलै रोजी शहरातील टिळकवाडी येथील जीएसएस कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पुरस्कार विजेते अनिंदो चॅटर्जी यांची तबला कार्यशाळा व सादरीकरण आयोजित केले आहे.
सकाळी 10 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 5 ते 7 या दोन सत्रात हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता सादरीकरण होईल. संगीत क्षेत्रात आमची तरंग अकादमी गेली 14 वर्षे सेवा कार्यरत असून रायकर फाऊंडेशन तीन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले आहे असे समीर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला तरंग अकादमीचे संचालक व डॉ. प्रकाश रायकर फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments