नुकत्याच प्रकाशित झालेल्या आऊटलूक मॅगझीन नुसार सरकारी वैद्यकीय विद्यालयाच्या मानांकनात बीम्सचा क्रमांक १२ व्या स्थानी आहे. बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेने या यादीत १२ वे स्थान मिळविल्याने जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आनंद व्यक्त केला आहे.

जुलै २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या आऊटलूक या मस्कत देशातील सरकारी वैद्यकीय संस्थांचे रँकिंग जाहीर करण्यात आले आहे. या यादीत बेळगाव जिल्हा वैद्यकीय शिक्षण संस्था १२ व्या स्थानी आहे. आऊटलूकच्या यादीनुसार बीम्स शैक्षणिक स्तरावर ८ व्या स्थानी, मूलभूत सुविधांमध्ये १२ व्या स्थानी, प्रशासन आणि प्रवेश यासंदर्भात १२ व्या स्थानी आहे.
नवी दिल्ली येथील एम्स, पुण्यातील एफ एम सी, जीपमेर पॉण्डेचेरी संस्थांकडून मान्यताप्राप्त असलेल्या कर्नाटकातील बीम्स संस्थेसाठी हि अभिमानाची बाब आहे. बीम्स संस्था हि केवळ राज्यातच नाही तर देशात देखील अव्वल क्रमांकावर आहे, हि आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. या संस्थेसाठी काम करणारे वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी तसेच विशेष अधिकारी प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास यांनी ही संस्था उत्तम स्तरावर नेऊन ठेवली असून अशाचपद्धतीने संस्था प्रगतीपथावर आणण्यासाठी भविष्यात देखील सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या वर्षभरापासून टीकेचे लक्ष्य ठरलेली बीम्स संस्था हि सुधारणेच्या वाटेवर असल्याचे या यादीनुसार निदर्शनास येत आहे. संपूर्ण देशात १२ व्या स्थानी असलेली बीम्स संस्था भविष्यात देखील अशीच प्रगती करत राहील, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.


Recent Comments