बेळगाव येथील केएलई संस्थेच्या राजा लखम गौडा विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र आणि जीवशास्त्रा वरील दोन दिवसीय वस्तुप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

‘बायो व्हेंच्युअर’ या शीर्षकाखाली वनस्पतीशास्त्र आणि जीवशास्त्र या विभागाच्यावतीने बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवसीय वस्तुप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वस्तूप्रदर्शनाला बागायत विभागाच्या अधिकारी सुमनांजली भोसले यांच्याहस्ते चालना देण्यात आली.
या प्रदर्शनात विविध वनस्पती व प्राण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. वनस्पतिशास्त्र विभागातील डायोनिया, सार्सिनिया, निफेन्सिस या कृमी खाणाऱ्या वनस्पतींचा या प्रदर्शनात सहभाग होता. यावेळी ऑर्किड्स, बोन्साय, हर्बेरिअम, पुष्पगुच्छ, धान्याची रांगोळी, वनस्पती टिश्यू कल्चरने लक्ष वेधून घेतले. २०२२-२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय अन्नधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर तृणधान्ये आणि नवीन धान्यांचे महत्त्व या प्रदर्शनाच्या माध्यमातून पटवून देण्यात आले.
याचप्रमाणे या प्रदर्शनात मशरूम लागवड, विषारी – बिनविषारी साप, सापांचे सांगाडे, विविध पक्षी आणि त्यांची घरटी बांधण्याची प्रक्रिया जीवशास्त्र विभागाच्यावतीने दाखविण्यात आली. या प्रदर्शनास बेळगावातील विविध महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांचे बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.
या प्रदर्शनासंदर्भात आरएलएस महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती कवळेकर यांनी अधिक माहिती दिली. तसेच या प्रदर्शनाला शेकडो महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिल्याचे त्या म्हणाल्या. 
यावेळी के एल इ संस्थेचे आजीव सदस्य एस. जी. नंजप्पणवर, डॉ. सतीश एम पी., पियू कॉलेजचे प्राचार्य प्रो. विश्वनाथ कामगोळ, प्रो. एम एन बागी, प्रो. आर एस मोबेन आदींसह इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments