Vijayapura

विजापुरात बॅडमिंटनपटूंसाठी टूर्नामेंट

Share

विजापूर शहरात उदयश्री स्पोर्ट्स अकादमीमध्ये विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंसाठी निमंत्रित बॅडमिंटन टूर्नामेंट आयोजित करण्यात आली होती.

विजापूर बॅडमिंटन क्लबचे दिवंगत श्री प्रभुदेव गडशेट्टी यांच्या स्मरणार्थ विजापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने टूर्नामेंट चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील ७८ स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली.

या टुर्नामेंटचे उद्घाटन विजापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांच्याहस्ते पार पडले. या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक स्पर्धकाने उत्तम खेळी खेळली. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये मुलांच्या विभागात मुधोळचा आदित्य प्रथम, विजापूर येथील शुभम द्वितीय तर मुलींच्या विभागात विजापूरमधील प्रतिका प्रथम, मान्यता द्वितीय, पुरुष घाटात विजापूरमधील ईश्वर आणि मंजुनाथ होनमट्टी प्रथम, बगलकोटमधील विरुपाक्ष आणि इर्फानखान द्वितीय, तसेच सर्वोत्तम खेळ खेळणाऱ्या आदित्य सावळगी आणि वेदांत जाधव यांचा सन्मान करण्यात आला. हि स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याने विजापूर बॅडमिंटन क्लबचे अध्यक्ष शिवकुमार गडशेट्टी यांनी सर्वांचे आभार मानले.

Tags: