Belagavi

राणी चन्नम्मा विद्यापीठात चर्चासत्राचे आयोजन अर्थशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

Share

बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन कर्नाटक राज्य अक्कमहादेवी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. बी के तुळसीमाला यांच्याहस्ते पार पडले.

13 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचा ”स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारतीय अर्थव्यवस्था: कामगिरी, धोरणे आणि संभावना” हा विषय होता. या चर्चासत्रात उदघाटक बी के तुळसीमाला यांनी सदर विषयावर आपले विचार व्यक्त करताना, घटना हि आर्थिक धोरणे तयार करण्याचा पाया असल्याचे मत व्यक्त केले.

या चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्रो पी एस कांबळे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले कि, आर्थिक धोरणे समाजवाद आणि समतेच्या संविधानाच्या मूलभूत तत्त्वांपासून फारशी विचलित होऊ नयेत, सर्वसमावेशक विकासासाठी प्रादेशिक समतोल, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य आणि शिक्षण या धोरणांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

यावेळी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू बसवराज पद्मशाली , प्रो. शिवानंद गोरनाळे, महसूल अधिकारी तसेच संमेलन संघटना अध्यक्ष प्रो. डी एन पाटील, संघटना सचिव डॉ. किरण कुमार पी, डॉ. सचिंद्र जी आर, सहसंघटना सचिव प्रो एच वाय कांबळे, प्रो. चंद्रिका के बी, प्रो बी एस नावी आदींसह अनेक प्राध्यापक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags: