Chikkodi

बेडजंगम कार्यकर्त्यांचा वीरभद्रेश्वराला महारुद्राभिषेक

Share

जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवण्यासाठी बेंगळुरूमध्ये बेडजंगम समाजातर्फे सुरु असलेले आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी बेडजंगम समाजाच्या कार्यकर्त्यांनी येडूरच्या श्री वीरभद्रेश्वर देवतेला महारुद्राभिषेक करून साकडे घातले.

वेदमूर्ती मल्लैया जडे, विश्वनाथ हिरेमठ, अन्नय्या पुजारी, महालिंग ब्रिंगी यांच्यासह बेडजंगम समाजाच्या सदस्यांनी  चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावातील वीरभद्रेश्वर मंदिरात भगवान श्रीवीरभद्रेश्वर देवाला  मंत्रोच्चार करून महारुद्राभिषेक केला. बी. डी. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरात गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेला सत्य प्रतिपादन सत्याग्रह यशस्वी व्हावा यासाठी हा महारुद्राभिषेक करून श्री वीरभद्रेश्वर देवतेला साकडे घातले. बेडजंगमांनी अत्यंत श्रद्धेने वीरभद्रेश्वराला महारुद्र अभिषेक केला आणि बेडजंगम समाजाचा प्रश्न सुटावा अशी प्रार्थना केली.

यावेळी संतोष मठपती, रवींद्र जडे, जगदीश मठद, बाबय्या हिरेमठ, रेवय्या हिरेमठ, सदाशिव दिवटे, उमेश स्वामी, चिदानंद मठपती, सोमू हिरेमठ आदी उपस्थित होते.

Tags: