Chikkodi

कल्लोळ गावात भाविकांना देऊळबंद ! दत्तमंदिर पाण्याखाली बुडाले

Share

महाराष्ट्रातील घाट भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कृष्णा नदीकाठावरील कल्लोळ गावातील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. त्यामुळे भाविकांना देऊळबंद झाले आहे.

होय, महाराष्ट्राच्या कोकण भागात वरुणराजाचे थैमान सुरूच आहे. आज चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व तिच्या उपनद्यांच्या पाणीपातळीत 2 फुटांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील राजापूर बंधाऱ्यामधून 88500 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

कल्लोळ बंधाऱ्यामधून 112260 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढणार आहे. कृष्णा नदीतील पाणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कल्लोळ गावातील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. त्यामुळे भाविकांना देऊळबंद करण्यात आल्याने भाविकांची निराशा झाली आहे. चिक्कोडी तालुक्‍यातील 4 खालचे पूल आधीच वाहून गेले आहेत. एकंदरीत चिक्कोडी तालुक्यातील नद्यांना पुराचा धोका असल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: