शिवशरण हडपद अप्पण्णा जयंतीनिमित्त बेळगाव शहरात आज हडपद अप्पण्णा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव, कन्नड आणि संस्कृती खाते, बेळगाव महानगर पालिका यांच्या वतीने आज बुधवारी हडपद अप्पण्णा जयंतीनिमित्त हडपद अप्पण्णा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता किल्ला तळ्याजवळील अशोक चौकातून सुरू झालेली ही मिरवणूक कुमार गंधर्व कलामंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी अनेक महिला डोक्यावर कुंभ घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
ढोल-ताशा व अन्य पारंपरिक वाद्यांच्या तालावर ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्यासह अनेक मान्यवरांनी ढोल वाजवत मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला. फ्लो यावेळी झांज मजलू हा मिरवणुकीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यावेळी महिलांच्या कलाकारांच्या पथकाने ढोल-ताशे वाजवून जल्लोष साजरा केला. 


Recent Comments