विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कळ्ळकवटगी गावात चोरट्यांनी संगमनाथ मंदिरातील देवाची ऐतिहासिक मूर्तीवर चोरटयांनी डल्ला मारून चोरटयांनी पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.
संगमनाथ देवाची मौल्यवान पितळी मूर्ती, पितळी बसवण्णा मूर्ती, इतर पितळ व तांब्याचे साहित्य चोरीला गेले. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून देवाच्या मूर्ती लांबवून पलायन केले.
सकाळी पुजारी नेहमीप्रमाणे मंदिरात पूजा करण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे उघड झाले. सुमारे तीन लाख रुपये किंमतीच्या मौल्यवान मूर्ती चोरीला गेल्या. ही घटना तिकोटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कलियुगात चोर देवालाही सोडत नसल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त होत आहे.


Recent Comments